‘त्या’ घटनेमुळे जितेंद्र आव्हाडांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल !

पंढरपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. मारहाणीच्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तक्रार भाजपकडून करण्यात आली आहे.

सोलापूरचे पालकमंत्री असणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी 3 एप्रिल रोजी विठ्ठल मंदिरात न जाता संत चोखामेळा यांचे दर्शन घेतले होते व त्यांचा जातिवाचक उल्लेख केला होता. भाजप माजी उपाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी पोलीस ठाण्यात संत चोखामेळा यांचा जातीवाचक उल्लेख करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली आहे.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्यावर मारहाणीचा देखील आरोप आहे. आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयावर टाकल्याने  ठाण्यातील एका तरुणाला बंगल्यावर आणून जितेंद्र आव्हाड यांच्या देखत मारहाण केली असल्याचा आरोप त्यांच्यावर असताना आता अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची तक्रार समोर आली आहे.