मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका आणि अभिनेता किरण माने सध्या जोरदार चर्चेत आहेत. राजकीय भूमिका मांडल्यामुळे मला मालिकेतून काढण्यात आल्याचे किरण माने (Actor Kiran Mane) यांनी म्हटले होते. माने यांच्या लिखाणशैलीमुळे यापूर्वीही अनेक चर्चा झाल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी केलेली एक पोस्ट चांगलीच गाजली. स्टार प्रवाहच्या भूमिकेवर राजकीय क्षेत्रातील नेत्यांनीही टीका केली आहे. किरण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी किरण मानेंची बाजू घेतली आहे.
याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे. आव्हाड ट्विटमध्ये म्हणतात, ‘मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेत्री श्वेता आंबीकर (आर्या), प्राजक्ता केळकर (कल्याणी) व शितल गीते (अक्षरा) यांच्या या बोलक्या प्रतिक्रियाच सांगतात की, किरण माने यांना सेटवरील वागणुकीमुळे नाही तर त्यांच्या सोशल मिडीयावरच्या लिखाणामुळे दबावतंत्र वापरुन मालिकेतून काढले गेलेय.’ असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी या तीन अभिनेत्रींच्या प्रतिक्रियांची व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.
मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेत्री श्वेता आंबीकर (आर्या), प्राजक्ता केळकर(कल्याणी) व शितल गीते(अक्षरा) यांच्या या बोलक्या प्रतिक्रियाच सांगतात की,किरण माने यांना सेटवरील वागणुकीमुळे नाही तर त्यांच्या सोशल मिडीयावरच्या लिखाणामुळे दबावतंत्र वापरुन मालिकेतुन काढले गेलेय. pic.twitter.com/TxXwmnbUC5
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 16, 2022
श्वेता आंबीकर म्हणतात, किरण माने माणुस म्हणून खूप चांगले आहेत. आजपर्यंत मी कधीही त्यांच्या तोंडून एखाद्याचा अपमान अथवा एखादी शिवी ऐकली नाही. अपशब्द कधीही ते वापरत नाहीत. शितल गीते म्हणतात, किरण माने सेटवर अतिशय चांगले वागतात, त्यांची वागणूक माझ्याविषयी एका लेकीप्रमाणे असल्यामुळे मी त्यांना वडिलांचा आदर देते. हा आदर सहजासहजी मिळत नाही. मला त्यांच्याकडून आतापर्यंत खूप काही शिकायला मिळालं. अशी प्रतिक्रिया शितल गीते यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
-
‘नया नया पंछी ज्यादा फडफड करता है’; विजय वडेट्टीवार यांची पडळकरांवर टीका
-
किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर स्टार प्रवाहची पहिली प्रतिक्रिया; ‘महिला नायिकांशी गैरवर्तन..’
-
औरंगाबादेत मोकाट जनावरांचा सुळसुळाट; महापालिकेची ‘ती’ घोषणा हवेतच विरली!
-
‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’; रवी राणांचा शिवसेनेवर हल्ला
-
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी कशाला हवी? नवनीत राणांचा हल्लाबोल