Jitendra Awhad | मुंबई : जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ठाण्यातील मॉलमधील मारहाण प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. विधियाना मॉलमधील हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपटाचा शो आव्हाड यांनी बंद पडला होता. आव्हाड यांचे कार्यकर्ते मॉलमध्ये घुसले. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शंभर जणांवर गुन्हा दाखल झाला होता.
अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी आव्हाडांची जामिनावर सुटका झाली. सुटका झाल्यानंतर आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. माझ्यावर कठोर कारवाई करावी, म्हणून चाणक्याकडून पोलिसांवर दबाव टाकला जात होता, पोलिसांना फोन केला जात होता, असा आरोप आव्हाडांनी केला होता.
यानंतर आव्हाडांनी उल्लेख केलेला चाणक्य आपणच आहोत, असा त्यांचा माझ्यावर रोख असेल तर मी त्यांचे आभार मानतो. कारण चाणक्य हा राजकारणातला चांगला माणूस होता, असं विधान नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केलं. त्यांच्या या विधानावर जितेंद्र आव्हाडांनी सडकून टीका केली आहे.
नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांचा एकेरी उल्लेख करत आव्हाड म्हणाले, “नरेश म्हस्के हा चाणक्य नव्हे तर शकुनीमामाची औलाद आहे. मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की, नरेश म्हस्के आमदार नाहीत, ते मंत्रिमंडळात कधी आले नाहीत, विधानसभेचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. विधानपरिषदेचं सदस्यत्व देणार म्हणून त्यांना केवळ चॉकलेट दाखवण्यात आलं असल्याचं म्हणत त्यांनी नरेश म्हस्के यांना चिमटा काढला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare । “बाप चोरणारी टोळी हे वाक्य ‘यांनी’ खरं केलं”; सुषमा अंधारेंचा निशाणा कुणावर?
- Vaijnath Waghmare | “सुषमा अंधारे आणि तुम्ही वेगळे का झालात?”; वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं कारण
- T20 World Cup | रिजवानला बाद करत सॅम करनने मोडला 12 वर्षांपूर्वीचा जुना विक्रम
- Sushma Andhare | “चार सहा महिन्यात शिंदे सरकार…”; सुषमा अंधारे यांचं भाकीत
- Umesh Patil on Rajan Patil | “पोरांच्या नावाने बापाच बिल फडतो” ; उमेश पाटलांची राजन पाटलांवर टीका