मुंबई: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नथुराम गोडसे यांची भूमिका संकरल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील टीका केली आहे.
अमोल कोल्हे यांच्या Why I Killed Gandhi चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट ३० जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या भूमिकेवरून जितेंद्र आव्हाड म्हणाले, विनय आपटे, शरद पोंक्षे ह्यांना ह्या भूमिके बद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केली त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार.
डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 20, 2022
तसेच आव्हाड पुढे म्हणाले, डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही, असं आव्हाड म्हणाले आहेत. यावर अमोल कोल्हे यांनी देखील स्पष्टीकरण देत म्हणले आहे की याचे चित्रीकरण मी राजकारणात येण्या आधीच झाले होते.
महत्वाच्या बातम्या: