पडत्या काळात पक्षभेद विसरून संजय राऊत नेहमी पाठीशी उभे राहतात : जितेंद्र आव्हाड

blank

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे नाव आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याच संदर्भात आज खुद्द शरद पवार ईडी कार्यालयात जाणार आहेत. शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी पक्ष आणि कार्यकर्ते पाठीशी उभे राहिलेच आहेत तर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही शरद पवारांना या प्रकरणात पाठिंबा दिला आहे. यावर राष्ट्रवादी नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांचे आभार मानले आहेत.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पवारांना पाठिंबा दिल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार मानतो. कारण अशा पडत्या काळात पक्षभेद विसरून संजय राऊत नेहमी पाठीशी उभे राहतात. शरद पवारांनी 50 वर्षाच्या राजकारणात अनेक विरोधी पक्षनेत्यांना मदत केली आहे. त्यांनी द्वेषाचे राजकारण कधीच केले नाही. त्यामुळे राऊत यांचा पाठिंबा म्हणजे शिवसेनेचा पाठिंबा असतो.

दरम्यान शिखर बँक घोटाळ्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह 70 जणांवर ईडी ने मनी लॉड्रींगचा गुन्हा नोंदवला आहे. मात्र या कथित प्रकरणात शरद पवार यांचे नाव नसतानाही त्यांची नोटीस काढली असल्याचे सांगत कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. याच पार्श्व भूमीवर आज ईडी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. शरद पावर दुपारी 1 वाजता ईडी च्या कार्यालयात जाण्यासाठी निघणार आहेत. आता शरद पवार यांच्या मुंबई येथील बंगल्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते जमले आहेत. प्रफुल पटेल, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, नवाब मलिक, हसन मुश्रीफ आदि नेते पवारांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत. तसेच ठिकठिकाणी कार्यकर्ते ही जमू लागले आहेत. त्यामुळे शरद पवार आता दुपारी 1 वाजता ईडी कार्यालया कडे जाण्यास निघणार आहेत.

महत्वाच्या बातम्या