मुंबई: बिहारमध्ये रेल्वे भरती बोर्डाच्या एनटीपीसी परीक्षेत हेराफेरी झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले (Uttar Pradesh student agitation)आहे. याअगोदर संतप्त विद्यार्थ्यांनी पाटणा, सीतामढी, मुझफ्फरपूर, आरा, बक्सर येथे रेल्वे मालमत्तेचे नुकसान केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान याबाबतच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP leader Jitendra Awhad) यांनी मोठा खुलासा केला आहे.
“बिहारमध्ये सुरू असणाऱ्या रेल्वे बोर्ड-NTPC साठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या लढाईतील एक वास्तव सांगतो. जागा होत्या सगळ्या मिळून ३७ हजारांच्या आसपास. अर्ज आले जवळपास १,२५,००,००० (सव्वा करोड). आणि एका अर्जाची किंमत होती ५०० रुपये. एकूण झाले ६२५ करोड रुपये. एवढा पैसा, १ वर्ष झाले केंद्राकडे पडून आहे. त्यावरच वर्षभरातील गोळा झालेलं व्याज वेगळं.यावर एकतरी मीडिया हाऊस ने चर्चा घडवून आणली का..?”, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
अर्ज आले जवळपास 1,25,00,000 (सव्वा करोड)
एका अर्जाची किंमत होती, 500 रुपये.
एकूण झाले 625 करोड रुपये.
एवढा पैसा,1 वर्ष झाल केंद्राकडे पडून आहे.
त्यावरच वर्षभरातील गोळा झालेलं व्याज वेगळं.
यावर एकतरी मीडिया हाऊस ने चर्चा घडवून आणली का..?— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 27, 2022
NTPC च्या परीक्षेसाठी एवढे अर्ज म्हणजे देशातील वास्तव आहे. हे भयाण वास्तव देशातील रोजगाराचे, बेरोजगारीचे आहे. हा स्फोट देशात अराजक माजवू शकतो.वेळीच सावध होऊन तरुणांच्या हातांना काम द्या. त्यांच्या स्वप्नांच्या सोबत खेळू नका. असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- योगी सरकारच्या काळात दरोड्यांमध्ये ७० तर चोऱ्यांमध्ये झाली ७२ टक्क्यांची घट- अमित शहा
- “भाजपचा विरोध खोटेपणावर आधारित”, टिपू सुलतान वादावरून नवाब मलिकांनी दिला भारतीय संविधानाचा संदर्भ
- “निःस्वार्थ समाजसेवेच्या व्यसनातून डॉ.अवचट यांनी हजारोंना व्यसनमुक्त केले”
- वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत नवाब मलिक म्हणाले, हा निर्णय शेतकऱ्यांच्या…
- ‘बेवड्यांना समर्पित सरकार’; मुनगंटीवारांची टीका