मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची १ मे रोजी औरंगाबद येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सुरू झालेला जातीय द्वेष, मशिदीवरील भोंगे आणि इतर काही मुद्द्यांवर भाष्य केले. यावर प्रतिक्रिया देत भोंगे उतरवायचं ठरवलं तर शिर्डीच्या मंदिरावरील भोंगादेखील उतरवावा लागेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. अजित पवारांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली. दरम्यान, विरोधकांच्या टीकेला आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी हटके अंदाजात प्रत्युत्तर दिले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी “आखिर क्यों” या चित्रपटातील एका गाण्याच्या काही ओळी ट्विट केल्या आहेत. ते म्हणाले आहेत की,‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमे ईनाम दिया है. तूफाँ में हमको छोड़ के साहिल पे आ गये. दुश्मन न करे दोस्त नेवो काम किया है…’ तसेच मंदिरावरचे भोंगे काढा असे म्हंटल्यानंतरची ही नैसर्गिक प्रतिक्रिया असल्याचेही आव्हाड म्हणाले आहेत.
दुश्मन ना करे दोस्त ने
वो काम किया है
उम्र भर का गम
हमे ईनाम दिया हैतूफाँ में हमको छोड़ के
साहिल पे आ गये
तूफाँ में हमको छोड़ के
साहिल पे आ गये.दुश्मन न करे दोस्त ने
वो काम किया है
…..
मंदिरावरचे भोंगे काढा असे म्हंटल्या नंतरची नैसर्गिक प्रतिक्रिया— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 5, 2022
दरम्यान, ‘भोंगे उतरवायचं ठरवलं तर शिर्डीच्या मंदिरावरील भोंगादेखील उतरवावा लागेल, कारण तिथे ५ वाजता काकडा आरती सुरु होते. ग्रामीण भागात उशिरापर्यंत हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम चालतात. जागरण गोंधळाचे कार्यक्रम चालतात, यात्रा चालतात, पण काही जणांना समजून घ्यायचं नाही. फक्त राजकारण करायचं आहे’, असे काल प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अजित पवार म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- “अंधारयात्रेवर चर्चा करण्याचे सोडून राहुल गांधी नाईट क्लबात गेले यावर…”, संजय राऊत यांची टीका
- “घालीन लोटांगण, वंदीन चरण…”, राहुल गांधींच्या ‘त्या’ फोटोवरून राम कदम यांचा शिवसेनेवर निशाणा
- “जे लोक देशात हिजाबपासून भोंग्यापर्यंत…”, संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
- IPL 2022 RCB vs CSK : विराटची गाडी पुन्हा अडकली..! बंगळुरुचं चेन्नईला १७४ धावांचं आव्हान!
- IPL 2022 RCB vs CSK : चेन्नई सुपर किंग्ज जवळपास स्पर्धेबाहेर..! बंगळुरुसमोर धोनीसेना ढेपाळली आणि…