Breaking: अखेर जितेंद्र आव्हाडांनी पाकिस्तानी साखरेचे गोडाऊन फोडले

pak sugar & jitendra awhad 1

मुंबई: पाकिस्तानची साखर मुंबईच्या बाजारात आल्याचे प्रकरण सध्या चांगलेच गाजताना दिसत आहे, भारतातील हवालदिल झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ नव्हे, तर साखर चोळण्याचं काम मोदी सरकारने केल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यानंतर आता आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेत पाकिस्तानी साखर ठेवलेले गोडाऊनवर छापा टाकत गोण्या फोडून टाकल्या आहेत.

देशात मोठ्या प्रमाणावर साखरेचे उत्पादन झाले असतानाही पाकिस्तानी साखर मुंबईच्या बाजारात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका बाजूला साखरेच्या मागणीत आलेली घट आणि दुसरीकडे शत्रू राष्ट्रातून साखर आयात करण्यात आल्याने सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. मात्र, हि साखर आयातच कशी झाली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी साखर ठेवलेल्या गोडावूनवर छापा मारला, यावेळी संपूर्ण गोडावून हे पाकिस्तानी साखरेच्या गोण्यांनी भरल्याच दिसून आलंं.

गोडावूनमध्ये असलेली साखर हि पाकिस्तानमधील प्रसिद्ध ‘चिस्तीयन’ व ‘लालूवल्ली सिंध’ या ब्रॅंण्डची साखर आहे, हि साखर जवळपास ३० हजार क्विंटलच्या आसपास असल्याच बोलल जात आहे. दरम्यान, ठराविक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात इतर कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याचे सरकारी धोरण आहे, या धोरणाचा फायदा उठवत मुंबईतील एका बड्या कंपनीने ३० हजार टनाच्या आसपास साखर आयात केल्याची माहिती मिळत आहे.