मुंबई: मध्य प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली आहे. मध्यप्रदेशमध्ये स्थानिक निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला मान्यता मिळाल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात अनेक चर्चा रंगताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad) यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे,
“मध्यप्रदेशला मा. सर्वोच्च न्यायालयाने OBC आरक्षणाला मान्यता दिली आहे. मग महाराष्ट्राला हा न्याय लागू का होत नाही. मध्यप्रदेशला मागच्या आठवड्यात दिलेला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने देशभराला लागू केला होता. तसाच आता हा देखिल निर्णय संपूर्ण देशाला लागू करा.”, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत केली आहे.
मध्यप्रदेशला मा. सर्वोच्च न्यायालयाने OBC आरक्षणाला मान्यता दिली आहे. मग महाराष्ट्राला हा न्याय लागू का होत नाही. मध्यप्रदेशला मागच्या आठवड्यात दिलेला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने देशभराला लागू केला होता. तसाच आता हा देखिल निर्णय संपूर्ण देशाला लागू करा.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 18, 2022
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळं मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने राजकीय वर्तुळात उत्साह दिसून येत आहे. तर इकडे महाराष्ट्रातही यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. यावर आता राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- राणा दाम्पत्याची पुढील सुनावणी १५ जुनला ; सरकारी वकील प्रदिप घरत यांची प्रतिक्रिया
- IPL 2022 MI vs SRH : ‘तुफान’ गोलंदाज उमरान मलिकनं मोडला बुमराहचा ‘मोठा’ विक्रम; वाचा!
- काय सांगता..! द्रविड असताना टीम इंडियाला मिळणार ‘नवा’ कोच; ‘या’ दिग्गजाकडे देणार जबाबदारी!
- “राजे, यांचा डाव ओळखा कारण पवार मराठ्यांचे कधीच झाले नाही”, निलेश राणेंचा सल्ला
- “कारवाई झाली नाही तर सोडणार नाही,” – देवेंद्र फडणवीस