अभ्यंग स्नानानंतर फटाके वाजवण्याची परंपरा मोडणार नाही : जितेंद्र आव्हाड

jitender_awhad

टीम महाराष्ट्र देशा- दिवाळी आणि इतर सणांना रात्री केवळ आठ ते 10 या वेळेतच फटाके वाजवण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. फटाक्यांवर सरसकट बंदी घालण्यास मात्र न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अभ्यंगस्नानानंतर फटाके वाजवण्याची परंपरा मोडणार नाही, परिणाम भोगण्याची तयारी असल्याचं सांगत निर्णयाला आव्हान दिलं आहे.ट्विटरच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी आपलं मत मांडलं आहे.

पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या तोंडावर फटाके विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळी सणात फटाक्यांच्या विक्रीला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना नेहमीप्रमाणे फटाक्यांच्या आतषबाजीत दिवाळी सण साजरा करता येणार आहे. मात्र, रात्री ८ ते १० या वेळेत फटाके वाजवता येणार आहेत. त्यामुळे अनेकांनी नाराजी वर्तवली आहे.

शिवस्मारकाच्या कामात अनियमितता,विनायक मेटेंच्या पत्रामुळे खळबळ