‘श्रीराम कोणाच्या सातबाऱ्यावर नाहीत’: जितेंद्र आव्हाडांचा भाजपाला टोला

blank

नाशिक: गेली कित्येक दशके राम मंदिराचा वाद चालू होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचा निकाल अखेर लागला व राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला होता. आता ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार असून अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमीपूजनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. यानंतर महाराष्ट्रात चांगलंच राजकारण पेटलं आहे.

आता, मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला प्रत्युत्तर देताना,  ‘श्रीराम कोणाच्या सातबाऱ्यावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही’, अशी जळजळीत टीका देखील केली आहे. नाशिकच्या सिडको परिसरात आज एका कोविड हॉस्पिटलचं उद्घाटन जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पार पडलं. विशेष म्हणजे, हे हॉस्पिटल शिवसेनेच्या पुढाकारानं तर उद्घाटन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हातून झाले आहे. शहरात कोरोनाची परिस्थितीत पाहता शिवसेनेच्या पुढाकारातून बाळासाहेब ठाकरे कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे.

‘दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली’

दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. यासंदर्भात आयबीएन लोकमतने वृत्त दिले आहे.  ‘कोरोनमुक्त महाराष्ट्र घडो हीच श्रीराम चरणी प्रार्थना केली आहे.  प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक भूमीचाच मी सुपुत्र, माझा जन्म नाशिकचा आहे. प्रभू श्रीराम हे कुणाच्या मालकीचे नाही. श्रीरामाचा सातबारा कोणाच्या खाजगी नावावर नाही, असं म्हणत आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर खोचक टीका केली आहे.

पुणे : २९ दिवसांत तब्बल २२,१७२ जण रूग्ण ठणठणीत झाले बरे

‘रामाच्या नावावर राजकारण करणे वेगळं आणि भक्ती वेगळी असते. गेली 40 वर्ष भाजपने रामाच्या नावावर राजकारण केलं, हे अख्ख्या जगाला  माहिती आहे. राम नाव घेऊन त्यांनी पाणी विकलं, विटा विकल्या. सत्ता मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी रामाच्या नावावर केलं’, असा थेट आरोप देखील आव्हाडांनी केला आहे.

राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी घोषणा केलेल्या १ कोटी मधला एकही रुपया अजून आला नाही!

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील, ‘शिवसेनेसाठी राममंदिर हा राजकारणाचा नव्हे तर श्रद्धा, अस्मिता आणि भक्तीचा विषय आहे’ असं म्हणत भाजपवर पलटवार केला आहे. तसंच, जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही अयोध्येला गेले होते, त्यामुळे हा श्रद्धेचा आणि भक्तीचा प्रश्न आहे, अशी आठवण करून एकनाथ शिंदेंनी टोला लगावला होता.