Share

Jitendra Awhad | “यांच्या बापाने यांना…”, राज्यपालांवर जितेंद्र आव्हाड कडाडले

Jitendra Awhad | मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मराठावाडा विद्यापीठातील कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासोबत केल्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापत आहे. अशातच राष्ट्रवादी (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी कोश्यारींवर टीकास्त्र सोडलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असे ते म्हणत आहेत. यांच्या बापाने यांना असा इतिहास शिकवला आहे का? शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात एकच तह झाला. हा तह मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर झाला होता. त्याला पुरंदरचा तह म्हणतात. या तहातील वाटाघाटीनुसार ते औरंगजेबाच्या दरबारात गेले होते. तेथे झालेला अपमान सहन न झाल्यामुळे तहात जेवढे किल्ले गेले होते, त्यापेक्षा दुप्पट किल्ले शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडून घेतले होते. हे आहेत शिवाजी महाराज, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

तसेच, यावेळी बोलत असताना त्यांनी हर हर महादेव चित्रपटाबाबत देखील घणाघात केला आहे. महाराष्ट्राची माती तुडवली जात आहे. लाथाडली जात आहे. असे असताना येथे बोलायला माणसं नसतील तर कठीण आहे. हर हर महादेव या चित्रपटात खोटा इतिहास सांगण्यात आला. या चित्रपटात खोटा इतिहास आहे, असे बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज म्हणाले आहेत. तो चित्रपट पाहायला कोणीही जात नाहीये. मात्र अजूनही महाराष्ट्र शासन झोपले आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Jitendra Awhad | मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मराठावाडा विद्यापीठातील कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now