मुंबई : महाराष्ट्र नवनीर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल (१ मे) औरंगाबद येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सुरू झालेला जातीय द्वेष, मशिदीवरील भोंगे आणि इतर काही मुद्द्यांवर भाष्य केले. दरम्यान, राज ठाकरेंच्या भाषणानंतर राजकीय वर्तुळात आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,‘लोकशाहीच्या मंदिरातील जनता जनार्दन नावाच्या देवाची चिंता करा. सध्याच्या परिस्थीमुळे देवाचा श्वास कोंडला आहे .’ तसेच महागाईचा डोंगर त्या देवा वर कोसळला आहे, असेही आव्हाड म्हणाले आहेत.
देव कणाकणात आहे त्याची चर्चा सोडा !
लोकशाहीच्या मंदिरातील जनता जनार्दन नावाच्या देवाची चिंता करा !
ह्या देवाचा श्वास कोंडला आहे परिस्थी मुळे ..
महागाई चा डोंगर त्या देवा वर कोसळला आहे ..— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 2, 2022
दरम्यान, ‘मशिदींवरील भोंग्यांचा विषय हा नवीन नाही. यापूर्वीही अनेकांनी तो मांडला आहे. मी फक्त त्याला पर्याय सुचवला आहे. ज्या मशिदींवर लाऊडस्पीकर लावले जातील, त्यांच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा. भोंग्यांचा विषय हा सामाजिक आहे, धार्मिक नाही. त्याला कुणी धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्हालाही धर्माचा आधार घेता येतो’, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “हनुमान चालिसाचे पठण करा बोलणारे आता शरद पवार यांच्या नावाचे…”, राष्ट्रवादीचे टीकास्त्र
- “खोटं बोल पण रेटून बोल”, ही शिवसेनेची नवी संस्कृती; केशव उपाध्येंचा टोला
- “…काळातील CBI अहवाल तपासा”, बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती विचारणाऱ्या फडणवीसांना राऊतांचा सल्ला
- “भाडोत्री गर्दी ‘भ्याड’ वक्ता अन् सतरंजी उचलायला…”, शिवसेनेचा हल्लाबोल
- “4 तारखेनंतर अजिबात ऐकणार नाही”, भोंग्याबाबत राज ठाकरेंचा इशारा