छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र – जितेंद्र आव्हाड

खा. उदयनराजेंच्या समर्थनार्थ जितेंद्र आव्हाड रिंगणात

वेबटीम : खासदार  उदयनराजे भोसले यांच्यावर दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या प्रकरणी उदयनराजे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी धाव घेतली होती . मात्र, न्यायलयाने त्यांची जामिनाची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे उदयनराजेंना कधीही अटक होऊ शकते.

 याच सर्व प्रकरणावरून सोशल मिडीयावर खासदार  उदयनराजे भोसले यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या जात आहेत . आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हि ट्विटर वर पोस्ट करत ‘साताऱ्यात 36 हजार एकर जमीन आहे ,त्या उदयनराजेंना लाखांच्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक म्हणजे छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र.’ असल्याच म्हंटल आहे .

हे वाचा

खा.उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला