fbpx

मनुष्य जीवनाची किंमत नसलेले लोकं सत्तेवर : जितेंद्र आव्हाड

jitendra awhad

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील संरक्षण भिंत कोसळण्याची घटना ताजी असताना मुंबईच्या डोंगरी भागात कौसरबाग इमारत कोसळली आहे. दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेबाबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

ही घटना दुर्दैवी आहे. मनुष्य जीवनाची किंमत नसलेले लोकं सत्तेवर आहेत. मरतायंत मरू दे, काही फरक पडत नाही. आपली दिनचर्या चालू ठेवणारे हे आहेत. दुसऱ्याच्या घरी मृत्युच तांडव घालत असताना आपल्याला काही वाटत नसेल आपण आम्ही असंवेदनशील आहोत. आता काही वैयक्तिक शंका बाळगता कामा नये अस आव्हाड म्हणाले आहेत.

तसेच मुंबईमध्ये असे वारंवार घटना होणं हे मुंबईला ही लाजीरवाण आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे मानवी मुल्यांची काही किंमत नाही. एक दिवसाची बातमी. यांचं पुढे काय? आता मालाडची दुर्घटना ही दुर्दैवी होती. दोन महिन्याच्या दुर्घटनेमध्ये १०० ते २०० माणसं मृत्यूमुखी पडले. आता पुढे काय?, असा मनाला प्रश्न सतावतोय. परंतू आता पुढे काय? आता पुढे काहीच नाही असंही आव्हाड म्हणाले आहेत.