आम्ही फुल पँटवरुन हाफ पँट वर आलोय..पण भाजपला अंडरपँटवर आणु

jitendra awhad

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज गोरेगावमध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेसच्या झालेल्या दयनीय अवस्थेवर भाष्य केले.

रावसाहेब दानवे यांनी ‘भाजप हा एक परिवार आहे. मात्र काँग्रेस हा परिवाराचा पक्ष आहे. काँग्रेस अध्यक्षांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना नवीन अध्यक्ष मिळत नव्हता. त्यामुळे काँग्रेसचा तुकडे कापून-कापून बरमुडा झाला आहे अशा शब्दात कॉंग्रेसवर निशाणा साधला.

हल्लीच्या काळात काँग्रेसचा बरमुडा पॅन्ट झाली अशी टिका रावसाहेब दानवे यांनी केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी याला सणसणीत चपराक देत जगात इतिहासाची पुनरावृत्ती होते, आम्ही फुल पँटवरुन हाफ पँट वर आलो आहे पण भाजपला अंडरपँटवर आणु असे प्रत्युत्तर पुण्यात झालेल्या वसाटोत्सवात दिले आहे.