आमचे तोंड काय शिवलेले नाहीत ; जितेंद्र आव्हाडांचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर

टीम महाराष्ट्र देशा: मी बोलण्यास सुरुवात केली, तर शरद पवारांची पळताभूई थोडी होईल, असा इशारा भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांनी आज येथे दिला. मुंबईतील भारिप बहुजन महासंघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलतांना त्यांनी राष्ट्रवादीपेक्षा डाव्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केल होत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जातीयवादी असल्यामुळे त्यांच्यासोबत संविधान बचाव रॅलीत सहभागी झालो नाही, अशी जाहीर मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.

आता यावर राष्ट्रवादीच्या गोटातून प्रतिक्रिया उमटायला सुरवात झाली आहे. “अठरापगड जातीचा बहूजन समाज संविधानिक छत्राखाली एकत्र येत असताना प्रकाश आंबेडकर यांनी आडकाठी घालू नये तसच तुम्ही तोंड उघडल तर आमचे तोंड काय शिवलेले नाहीत”, अस प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांना दिलंय.

पहा व्हिडीओ काय म्हणाले जितेंद्र आव्हाड