फडणवीस आणि ठाकरेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला -जितेंद्र आव्हाड

jitendra avhad

टीम महाराष्ट्र देशा:- छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आणि साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार उदयनराजे भोसले यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्ली येथे त्यांचा प्रवेश झाला. शिवरायांच्या विचाराने भाजप काम करत आहे, त्यामुळे प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं उदयनराजे यांनी सांगितले आहे.

या उदयनराजेंच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपच्या मेगाभरतीची खिल्ली उडवली आहे.राष्ट्रवादीच्या जितक्या नेत्यांनी आतापर्यंत भाजप-शिवसेनेत प्रवेश केला तो पाहता दोन्ही पक्षांनीच राष्ट्रवादीत प्रवेश केला असे अप्रत्यक्षपणे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या इतकी वाढली आहे की, तिथं नव्यांची संख्याच जास्त दिसायला लागली आहे. याच मुद्द्यावरून आव्हाड यांनी ट्विटरवरून खोचक टोमणा मारला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, मुख्यमंत्री आणि उध्दवजी केबिन मध्ये बोलत बसले होते अचानक झंम्प्या तिथे कुतुहलाने बघायला गेला तिथे उदयनराजे भोसले,भास्कर जाधव, गणेश नाईक, निंबाळकर, सचिन अहिर आणि इतरांना बघून तो ओरडत बाहेर आला, मुख्यमंत्री आणि उध्दवजीने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला म्हणून.

दरम्यान उदयन राजेंच्या भाजप प्रवेशावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती. त्यांनी ट्वीटरवरून ट्वीट करत उदयनराजेंच्या आचरट बालिश चाळ्यांना पाठिशी घालून जवळच्या माणसांना दुखावलं, काय मिळालं? असा सवाल थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला होता.

महत्वाच्या बातम्या