बापट आणि चंद्रकांतदादा या बिनडोक चौकीदारांना महाराष्ट्र भूषण द्या – आव्हाड

टीम महाराष्ट्र देशा : मिशन शक्ती अभियान यशस्वीपणे पूर्ण करत अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करण्याचे सामर्थ्य भारताने सिद्ध केले आहे. बुधवारी ओडिशाच्या बालासोर किनारपट्टीजवळील एपीजे अब्दुल कलाम बेटावरील तळावरून क्षेपणास्त्राने अवकाशातील उपग्रह नष्ट करण्यात आला, नष्ट करण्यात आलेला उपग्रह हा पूर्वी भारतानेच प्रक्षेपित केलेला मात्र सध्या वापरात नसलेला असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, क्षेपणास्त्राने अवकाशात उडवण्यात आलेला उपग्रह पाकिस्तान अथवा चीनचा असल्याचं म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जावई शोध लावला आहे, तर भाजपचेच दुसरे मंत्री आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी देखील ट्विट करत ‘भारतावर टेहाळनी’ करत असलेला उपग्रह नष्ट करण्यात आल्याचं सांगितल आहे.

यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांची चांगलीच फिरकी घेतली आहे. “गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील ह्या दोन युद्ध आणि अंतराळ तंत्रज्ञांनी काल भारताने चीन किंवा पाकिस्तान चे यान पाडले असा दावा केला ह्या दोघांचा महाराष्ट्र भूषण देऊन शिवाजी पार्क वर सत्कार करायला हवा” अस ट्विट करत या दोन मंत्र्यांचा उल्लेख आव्हाडांनी बिनडोक चौकीदार असा केला आहे.

नेमक काय म्हणाले चंद्रकांत पाटील

Loading...

पंतप्रधान मोदी यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. सॅटेलाईट पाडण्याची क्षमता जगात फक्त दोन देश अमेरिका आणि जर्मनीकडे होती, आज भारताने देखील आपली क्षमता सिद्ध केली आहे. आता हे सॅटेलाईट चीन किंवा पाकिस्तानचं असू शकत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.