आव्हाडांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावर राम कदम संतापले, म्हणाले…

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाडांनी ‘हिंदू आपल्या पूर्वजांचे अंत्यसंस्कार कोठे झाले, हे सांगू शकत नाही, मुस्लिम सांगू शकतो. कारण, त्यांचे हक्काचे कब्रस्तान आहे,’ आव्हाडांच्या या वादग्रस्त विधानावर भाजप नेते राम कदम यांनी टीका केली आहे. कदम म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य केलं, ते अतिशय दुर्दैवी आहे. मुस्लिम समाजाला खूश करण्यासाठी त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यातून केवळ हिंदू धर्म नव्हे, तर मुस्लिम समाजसोडून ज्या-ज्या धर्मामध्ये अंत्यविधी दफनविधीचा होत नाही, त्या धर्मांचा अपमान केला आहे, असे भाजप नेते राम दाकाम म्हणाले.

ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना कदम म्हणाले, ‘आव्हाडांनी समस्त हिंदू धर्माची माफी मागितली पाहिजे. वक्तव्य मागे घेतलं पाहिजे, अशी मागणी कदम यांनी यावेळी बोलताना केली. दरम्यान कदम यांच्या या टीकेवर जितेंद्र आव्हाड काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘हिंदूत्वाची भाषा बोलणारी शिवसेना, उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री दिवसाढवळ्या हिंदूंचा अपमान करतो आणि बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्वाची भाषा करणारी शिवसेना गप्पा का? असा सवाल त्यांनी ठाकरेंना विचारला. तसेच बाळासाहेब जिंवत असते, तर त्यांनी हे खपवून घेतले नसते. अशा नेत्याचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे”, अशी उद्विग्न प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली.

दरम्यान, हिंदू आपल्या पूर्वजांचे अंत्यसंस्कार कोठे झाले, हे सांगू शकत नाही, मुस्लिम सांगू शकतो. कारण, त्यांचे हक्काचे कब्रस्तान आहे. तो आपल्या आजोबांचे, पणजोबांचे दफन कोणत्या कब्रस्तानात झाले, असे हक्काने सांगू शकतो, असे वक्तव्य राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी 18 जानेवारीला भिवंडी येथे संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत केले होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'