महाराजांचा वारसा असलेल्या गाद्यांमध्ये सरकारकडून भेदभाव – जितेंद्र आव्हाड

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शनिवारी साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वंशज आहेत. तसेच शिवेंद्रराजे हेही महाराजांचे वंशज आहेत. त्यांच्याविषयी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या कोल्हापूरच्या गादीवर उपरोधिक वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. यावर आक्षेप घेत, सरकारकडून महाराजांचा वारसा असलेल्या गाद्यांमध्ये भेदभाव होतोय, ही दुर्दैवी बाब असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केलेय.

याविषयी बोलताना आव्हाड यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात कोल्हापूरची गादी आणि साताऱ्याच्या गादीबाबत एक अढळ स्थान आहे. यात भेदभाव करण्याचे काम आजवर कोणीही केलेले नाही. परंतु ज्यांच्या मनात याबाबत शल्य होते त्यांचे प्रतिनिधीत्व करणारे हे सरकार आहे असं विधान केले आहे.

तसेच पुढे बोलताना ‘समतामूल्ये आणि समाजाभिमुख राजकारणाचा वसा ज्या शाहू महाराजांनी घेतला त्यांच्या गादीविषयी शंका घेतली जाते, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे मत आव्हाड यांनी मांडले. त्यांचेच वंशज संभाजीराजे हे भाजपा पक्षात असल्याची आठवणही आव्हाड यांनी करून दिली.