सुरक्षा व्यवस्था काढून काही होणार नाही, लोकांचे प्रेम,आपुलकी हे साहेबांच सुरक्षाकवच

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा काढण्यात आली आहे. शरद पवार यांच्यासह 40 जणांची सुरक्षा काढण्यात आली आहे. 20 जानेवारी पासून सुरक्षा रक्षक काढले आहे. सुरक्षा रक्षक कमी करण्याबाबत अधिकृत माहिती केंद्रीय गृहखात्याने दिलेली नाही.

तसेच राज्यात शरद पवार यांना Z security आहे. पवारांच्या घरात गस्त घालणारे दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान हटवण्यात आले आहेत. पवार यांच्या दिल्लीतील घरी सहा जनपथला तीन गार्ड होते. जे शिफ्ट मध्ये काम करत होते आणि एक PSO हा देखील होता. विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता मोदी सरकारकडून सुरक्षेत कपात केल्याची माहिती आहे.

Loading...

याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. शरद पवार यांची सुरक्षा व्यवस्था काढून काही होणार नाही. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला हा महाराष्ट्रचा इतिहास आहे. लोकांचे प्रेम,आपुलकी आणि आपलेपणा हे साहेबांच सुरक्षाकवच आहे. सुरक्षा व्यवस्था काढली बरं झालं, आज महाराष्ट्राला समजलं भाजप किती खोट्या मनोवृत्तीचे आहेत ते. असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

दरम्यान, यापूर्वीदेखील काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, त्या पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा केंद्र सरकारने काढून घेतली असून त्यांना आता झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. यावरुन काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर टीका केली होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी