जितेंद्र आव्हाडांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या राम कदमांना फटकारलं…

टीम महाराष्ट्र देशा : दहीहंडीच्या निमित्तानं भाजप नेते आणि घाटकोपर येथील भाजपाचे आमदार राम कदम यांनी ‘देशातील सर्वात मोठी’ दहीहंडी उभारल्याचा दावा करत निवडणुकीआधी भाव खाण्याचा प्रयत्न केला. या दहीहंडीसाठी स्थानिकांनी एकच गर्दी केली होती. आणि या गर्दीसमोर राम कदम जरा जास्तच जोशात आले.आणि या जोशातच त्यांचा जीभेवरचा ताबा सुटला,’ तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तरीही मला सांगा मी त्या मुलाली पळवून आणण्यास मदत करतो.’ असा भाषेत त्यांनी गर्दी समोर वक्तव्य केलं.

आता यावरून राष्ट्रवादी क्राँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम कदमांना चांगलच फैलावर घेतल आहे. आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून राम कदम यांचा एक व्हिडीओ ट्विट करत यांच्या राज्यात महिला कशा सुरक्षित राहतील असा सवाल केला आहे.

राम कदम यांच्या भाषणाची क्लिप शेअर करत आव्हाड म्हणतात, ‘बेताल वक्तव्य करणारा भाजपा नेत्यांमध्ये आणखी एकाची भर. रक्षाबंधन, दहिकाला उत्सव या पवित्र सणांच्या दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे! ट्विटच्या शेवटच्या ओळीमध्ये त्यांनी कदम यांच्यावर टीका केली.