मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी काल (१८ मे) मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांच्या प्रदर्शनास भेट दिली. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडणाऱ्या छायाचित्रांमधून त्यांच्या आठवणींना शरद पवारांनी उजाळा दिला. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचीही उपस्थिती होती. त्यांनी ट्वीट करत यासंबंधी मोठे वक्तव्य केले आहे.
“काही छायाचित्रकार आणि मुंबई विद्यापीठातर्फे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. माझ भाग्य कि, या कार्यक्रमाला मला साहेबांसोबत उपस्थित राहता आलं. बाळासाहेब ठाकरे आणि शदर पवार साहेब या दोघांचे संबंध, त्यांचा वैचारिक विरोध, त्यांच एकमेकांबद्दल असलेलं प्रेम, आपुलकी, स्नेह हे महाराष्ट्रात परत कधी दिसेल का? या प्रश्नाने मला रात्रभर अस्वस्थ केले.”, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि शदर पवार साहेब या दोघांचे संबंध, त्यांचा वैचारिक विरोध, त्यांच एकमेकांबद्दल असलेलं प्रेम, आपुलकी, स्नेह हे महाराष्ट्रात परत कधी दिसेल का ? हा प्रश्नने मला रात्रभर अस्वस्थ केले
एक क्षण यिपले सचिन वैद्य या छायाचित्रकाराने— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 19, 2022
दरम्यान ज्यांना आयुष्यात कधीही विधानसभा आणि संसद माहीत नव्हती त्या लोकांना बाळासाहेबांनी मोठमोठ्या पदांवर बसवलं. त्यामुळे अशा या मोठ्या व्यक्तीचं आज या ठिकाणी छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. अत्यंत देखणं असं हे प्रदर्शन आहे. बाळासाहेब स्वत:ही एक कलाकार आणि व्यंगचित्रकार होते. त्यांच्या व्यंगचित्रांना एक प्रकारची धार असायची. त्या धारेचा विरोधकांवर जो काही परिणाम व्हायचा त्याची किंमत मलासुद्धा कधीकधी मोजावी लागली. अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.
महत्वाच्या बातम्या:
- आशिष शेलारांच्या टीकेवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- नवजोत सिंह सिद्धू यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावली एक वर्षाची शिक्षा
- IPL 2022 : आयपीएल लिलावात १७ कोटी मिळूनही ‘या’ संघाच्या कर्णधाराने केली मानधनवाढीची मागणी; वाचा!
- हेरवाड ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ निर्णयाचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक
- IPL 2022 RCB vs GT : बंगळूरूसाठी गुजरातचा ‘कठीण’ पेपर; पास झाले तर ठीक नाहीतर…!