महाराष्ट्र पेटवणार ; पुरंदरेंना ‘पद्मविभूषण’ देण्यावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण पुरस्काराची घोषणा महाराष्ट्र सरकारने केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले होते. त्यानंतर आता पुरंदरेना केंद्र सरकारकडून पद्मविभूषण जाहीर झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत.जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरून पुरंदरे आणि सरकारवर सडकून टीका केली आहे. शिव सन्मान परिषदा घेत महाराष्ट्र पेटवणार अशा भाषेत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.तसेच सरकारने पुरंदरेंना सन्मानित करून शिवप्रेमींच्या जखमांना मीठ चोळले,अशी तिखट प्रतिक्रिया आव्हाडांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने आज रात्री उशिरा ‘पद्म’ पुरस्काराची घोषणा केली. ११२ पुरस्कार विजेत्यांमध्ये चार ‘पद्मविभूषण’, १४  ‘पद्मभूषण’ व ९४  ‘पद्मश्री’ विजेत्यांचा समावेश आहे. चार ‘पद्मविभूषण’ पुरस्कार विजेत्यांमध्ये पुरंदरे यांचाही समावेश आहे.