जितेंद्र आव्हाड यांनी संजय काकडेंची अक्कल काढली

jitendra awhad

पुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी हल्लाबोल आंदोलनाबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर टीका केली होती. काकडेनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

संजय काकडे हे आधी राष्ट्रवादी च्या नेत्यांच्या जवळचे होते. मात्र खासदार झाल्यानंतर त्यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. त्यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे आव्हाडांनी संजय काकडेंची अक्कल काढली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, काकडे यांनी केलेल्या विधानाबाबत हसावे की रडावे हेच कळले नाही, ”काकडे साहेब ५० लाखांचे घड्याळ, दोन लाखांचा शर्ट आणि पाच लाखांची पॅन्ट घातली की अक्कल येत नाही. कृतघ्नपणा दाखवायच्या अगोदर पाहिले दिवस काय होते ते आठवा. पूर्वीचे दिवस परत येण्यास वेळ लागणार नाही,” असा टोला आव्हाड यांनी लावला आहे.