ठाणे : ठाण्यातील रेल्वे ट्रॅकच्या बाजूला राहणाऱ्या लाखो गरिबांना घरे खाली करण्याच्या नोटीसा आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “केंद्र सरकारने वेळीच निर्णय घ्यावा. नाहीतर १० झोपडपट्टीवासियांनी जर ठरवलं तर पूर्ण भारतातील रेल्वे बंद होऊन जाईल. गरीब लाचार नसतो. तर लढाऊ असतो,” असा इशाला जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण पूर्वेकडील आनंद वाडी परिसरात रहिवाशांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते. सर्व कागदपत्रे असताना घराच्या बाहेर जायला सांगत आहेत, यांच्या बापाचं राज्य आहे का? महाराष्ट्र सरकारचा न्याय आहे की झोपडपट्या ना संरक्षण मिळायला हवे. मर जायेंगे ,जान दे देंगे घर नही देंगे, राष्ट्रवादी सर्वांना साथ देईल, असा विश्वास जितेंद्र आव्हाडांनी दिला आहे.
रेल्वे ट्रॅकच्या बाजूला राहणाऱ्या लाखो गरिबांना घरे खाली करण्याच्या नोटीस आलेल्या आहेत. केंद्र सरकारने वेळीच निर्णय घ्यावा. नाहीतर 10 झोपडपट्टीवासियांनी जर ठरवलं तर पूर्ण भारतातील रेल्वे बंद होऊन जाईल. गरीब लाचार नसतो. तर लढाऊ असतो.
क्या गरिबोकि जान, जान नहीं होती सेठ. pic.twitter.com/5fsjkWiLat
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 22, 2022
“रेल्वे ट्रॅक बंद झाला तर अख्खा भारत बंद होतो. मी १० बाय १० च्या घरात राहून आलोय. सार्वजनिक संडासाचा वापर मी देखील केला आहे, जो डर गया वो मर गया, घाबरू नका घर तुटणार नाही,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“सामुदायिक शक्ती जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हा निर्णय घ्यावा लागतो, उद्या जर पाच लाख लोकांनी एकत्रित पणे रस्त्यावर उतरायचे ठरवलं, तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार समोर अवघड परिस्थिती होईल. हा लढा फक्त इथलाच नाही. झोपडपट्टी ही गरिबीची निशाणी आहे. कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले. आता या नोटिसा दिल्या आहेत. केंद्र सरकारने गरीबांचा विचार करावा. त्यांना न्याय द्यायचा विचार करावा आणि प्रश्न कायमचा सोडवावा”, असे देखील आव्हाड यांनी केंद्र सरकारला ठणकावून सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Oscar 2022 : सुर्याचा ‘जय भीम’ आणि मोहनलालचा ‘मरक्कर’ या वर्षीच्या ऑस्करच्या यादीत
- सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका, ‘मैं चला’ गाणं व्हायरल
- “हायकमांडने झापल्यानंतर नाना पटोलेंनी कथित ‘मोदी’ तयार केला”; भाजप खासदाराचा आरोप
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेत चक्क उर्फी जावेद? जाणून घ्या सत्य
- प्रसिध्द गायिका लता दीदींच्या प्रकृतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका-निर्मात्या अनुषा श्रीनिवासन