fbpx

भिडेंच्या बागेत पिकणाऱ्या आब्यांची एजन्सी घ्यायची आहे, कोणाशी संपर्क करू? – आव्हाड

jitendra avhad

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक भिडे गुरुजी यांनी काल नाशिक येथे बोलताना ‘माझ्या बागेतील आंबे खाल्यावर मुलं होतात’ असा अजब दावा केला होता. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे ते अडचणीत आले असून, त्यांच्यावर सामाजिक माध्यमांमधून टीकेची झोड उठत असल्याचं पाहायला मिळतयं.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर टीका करताना ‘संभाजी भिडेंच्या बागेत पिकणाऱ्या आब्यांची एजन्सी मला हवी आहे. कोणाशी संपर्क साधावा लागेल ते सांगा?’ असं म्हंटलं आहे. तसंच त्यांनी या प्रकरणावर  ट्विटचा भडीमार  करत संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.