Share

Jitendra Awhad | “मेहेंदळेंच्या तोंडून हे वाक्य वदवून घ्या”, जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना आव्हान

Jitendra Awhad | मुंबई : राज ठाकरे यांनी काल कोकण दौऱ्यावर इतिहासकार जयसिंग पवार यांची भेट घेतली. वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटावरील वादावर त्यांनी यावेळी भाष्य केलं. यावरुन राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना गजानन मेहेंदळे (Gajanan Mhendale) यांच्याबाबत आव्हान दिलं आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर येथील भवानी मंदिरात जितेंद्र आव्हाड दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वेडात मराठे वीर दौडले, किती हे माहिती नसल्याचं वाक्य इतिहासकार गजानन मेहंदळे यांच्या तोंडून वदवून घ्या, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

नेसरी खिंडीत त्यावेळी झालेल्या लढाईत प्रतापराव गुजर यांच्यासोबत नेमके किती जण होते, हे इतिहासकार गजानन मेहंदळेही सांगू शकणार नाहीत. जगात कुठेच याची नोंद नाही, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

दरम्यान, जानकी नावाची मुलगी ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम 1 यांची बायको होती. प्रतापराव गुजर हे तिचे नातेवाईक होते. पण बेहलोल खानला पराभूत केल्यानंतर गुजर यांनी त्याला कैद न करता सोडून दिलं. हा शिवाजी महाराजांना निर्णय आवडला नव्हता. ते प्रतापराव गुजरांच्या मनाला लागलं आणि त्यांनी म्हणावी तशी तयारी न करता बेहलोल खानला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

महत्वाच्या बातम्या :

Jitendra Awhad | मुंबई : राज ठाकरे यांनी काल कोकण दौऱ्यावर इतिहासकार जयसिंग पवार यांची भेट घेतली. वेडात मराठे वीर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now