जितेंद्र आव्हाडांचा दोन मिनिटांचा रेल्वे रोको

एल्फिन्स्टन रेल्वेस्टेशनवर झालेल्या दुर्घटनेनंतर राजकीय पक्षांकडून सरकार आणि रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात कळवा स्टेशनवर रेलरोको करण्यात आला. मात्र हा रेलरोको अवघ्या दोन मिनिटात संपला.

एल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड हे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास कार्यकर्त्यांसह रेलरोको करण्यासाठी कळवा स्टेशनवर आले. मात्र आधीच तयारीत असलेल्या पोलिसांनी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अवघ्या दोन मिनिटात ताब्यात घेऊन बाजूला केलं. यामुळे मोठ्या जोशात आंदोलन करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. मात्र पोलिसांच्या कारवाईने एकही लोकल न थांबल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला नाही.