ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात गद्दारी केली अशांचा अभ्यासक्रम शिकवला जाणार : जितेंद्र आव्हाड

टीम महाराष्ट्र देशा :  नागपूर विद्यापीठा कडून बी. ए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. अभ्यासक्रमातील एक बदल धक्कादायक आहे. विद्यापीठाने अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश केला आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Loading...

आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी ब्रिटिशांना साथ दिली.
स्वातंत्र्य लढ्यात गद्दारी केली. ज्यांनी विचारांचे विष पेरले आणि त्या मुळे महात्मा गांधी ह्यांची हत्या झाली त्यांचा इतिहास लिहिणार आणि शिकवला जाणार, असे आव्हाड यांनी ट्विट केले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बी.ए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)च्या इतिहासाचा समावेश केला आहे. 1885 ते 1974 या कालखंडात भारताचा इतिहास या भागाचा समावेश आहे. हा भाग शिकवताना संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान देखील विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे.

दरम्यान आतापर्यंत कोणत्याच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आरआरएसच्या इतिहासाचे धडे दिले गेले नाहीत. मात्र नागपूर विद्यापीठाने अभ्यासक्रमात आरएसएसच्या इतिहासाचे धडे घेतल्याने महाराष्ट्रातील नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.







Loading…










Loading…

Loading...