राजे यातना होतात हे बघून … : जितेंद्र आव्हाड झाले भावूक

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते आणि सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये केला आहे. दरम्यान, गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिक येथे झाला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मोदींनीही आपल्य़ा भाषणात छत्रपतींचे तेरावे वंशज उदयनराजेंसाठी गौरवोद्गार काढले. तसेच ही पगडी म्हणजे माझा सर्वोच्च सन्मान असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. मात्र उदयनराजे यांचा या सभेतील एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

तसेच या फोटोमध्ये नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा सन्मान होताना दिसत आहे. त्यांना हार घातला जातोय, तर दुसरीकडे उदयनराजे मागे उभं असल्याचं दिसतंय. फोटोचा धागा पकडून उदयनराजेंचा अपमान झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर पडू लागल्या आहेत.

दरम्यान, यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदी मान्यवर उपस्थित होते.