राज ठाकरेंच्या नावाने शिमगा करू नका, 1980 ला शिवसेनेनेही काँग्रेसला पाठींबा दिला होता

टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी आघाडीला समर्थनाची भूमिका घेतली आहे, गुढीपाडव्याला आयोजित मेळाव्यात राज ठाकरे यांनी मोदी – शहा यांच्यावर घणाघाती टीका करत वातावरण तापवले आहे. लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार न देता, मनसे आघाडीला मदतीची भूमिका घेत असल्याने शिवसेना – भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस आ जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून सेना – भाजप नेत्यांना १९८० ची आठवण करून देत टोला लगावला आहे. 1980 सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने एकदेखील जागा लढवली नव्हती. शिवाय त्याच निवडणुकीत सेनेने काँग्रेसला समर्थन देखील दिल होत. आज राज ठाकरे देखील एकही जागा लढवत नाहीये, त्यांच्या नावाने शिमगा करणाऱ्या लेकरांच्यासाठी ही खास माहिती…! म्हणत आव्हाड यांनी ट्विट केले आहे. १९८० च्या मार्मिकमध्ये आलेल्या लेखाचे छायाचित्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये वापरलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी उमेदवार न देता आघाडीला मदतीची भूमिका घेतली आहे, यासाठी ते राज्यभरात ९ ठिकाणी सभा घेणार आहेत, मनसे मेळाव्यात रज यांनी मोदी सरकारच्या कामकाजाचे व्हिडीओ प्रेझेंटेशनमधून वाभाडे काढले होते. त्यामुळे शिवसेना – भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर आता आव्हाड यांनी मार्मिकच्या बातमीचा हवाला देत युतीला आरसा दाखवला आहे.

राज ठाकरे यांच्या सभांच्या तारखा 

1) १२ एप्रिल, नांदेड.
2) १५ एप्रिल,  सोलापूर.
3) १६ एप्रिल, इचलकरंजी.
4) १७ एप्रिल, सातारा.
5) १८ एप्रिल, खडकवासला
6) १९ एप्रिल,  रायगड.