उध्दव ठाकरेंचा सत्तेतून बाहेर पडण्याचा ९५ वा इशारा: जितेंद्र आव्हाड

उध्दव ठाकरे यांची सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देण्याच्या शतकाकडे वाटचाल

टीम महाराष्ट्र देशा: उध्दव ठाकरे यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा तब्बल ९५ वा इशारा दिला अशी खरपूस टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केली आहे. त्याचबरोबर ते आता शतकाच्या दिशेने वाटचाल करत असल्याची मार्मिक भाष्य देखील आव्हाडांनी केली आहे.

उध्दव ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरअसताना भाजप सरकार मधून बाहेर पडण्याची टिप्पणी केली होती  यालाच अनुसरून आव्हाडांनी उध्दव ठाकरे हे सत्तेतून बाहेर पडण्याच्या शतकाकडे वाटचाल करत असल्याची टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत ९५ वेळा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा वजा दम भाजपला दिला होता पण तो सध्या तरी खरा ठरत नसल्याच चित्र दिसत आहे.