‘जय काली कलकत्तावाली ५६ इंच की हवा निकाली’ : जितेंद्र आव्हाड

टीम महाराष्ट्र देशा :  राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ममता बनर्जी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी टीका केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या १९ मे ला होणार आहे. याचदरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या पश्चिम बंगाल मधील रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारावरून भाजपात आणि विरोधी पक्षात चांगलेच आरोप प्रत्यारोप झाले. याचदरम्यान तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा तसेच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले होते.

ममता बनर्जी यांनी केलेल्या टीकेचे समर्थन करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक फोटो शहरे केला आहे. त्यामध्ये पंतप्रधान मोदींचा फोटो आणि त्याखाली अंध मुक्त भारत असे लिहिले आहे. इतकेच नव्हे तर, त्याच फोटोमध्ये ममता बनर्जी यांचा फोटो असून त्याखाली ‘ जय काली कलकत्तावाली ५६ इंच की हवा निकाली’ असे लिहिले आहे.