भारत-पाकिस्तान दुष्मनी हा संवेदनशील विषय मोदींनी कावेबाजपणे निर्माण केला : आव्हाड

jitendra awhad

टीम महाराष्ट्र देशा- डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे, अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत, मुंबईत पेट्रोलने नव्वदी ओलांडली, राफेलच्या भडिमारातून पळताना मोदी सरकारच्या नाकी नऊ आले आहेत. अशावेळी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवायला भारत-पाकिस्तान दुष्मनी हा संवेदनशील विषय नरेंद्र मोदींनी कावेबाजपणे निर्माण केला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली.

जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट – सत्ता महत्त्वाची; देश नाही!
पंडित नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाचा सतत उद्धार करणारे नरेंद्र मोदी, आपलं धोरण मात्र देशाचं किती नुकसान करतंय हे तपासत नाहीत. त्याचं एक मोठं उदाहरण मागच्या आठवड्यात दिसलं. राफेलच्या धुमश्चक्रीत त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून ते सांगायला हवं.

Loading...

येत्या काही दिवसांत संयुक्त राष्ट्र संघटनेची आमसभा न्यूयॉर्कला होणार आहे. भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी तिथे परस्परांची भेट घेऊन भारत-पाक संवाद पुन्हा सुरू करावा, अशी विनंती नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खानने मोदी यांना एका पत्राद्वारे केली. मोदी यांनी तीन दिवसांत ती मान्य केली. इम्रान खान यांचा प्रस्ताव भारताने स्वीकारला आहे असं भारतीय परराष्ट्र खात्यातर्फे पाकला कळवण्यात आलं. तशा बातम्या सुद्धा छापून आल्या. चार दिवसांपूर्वी अचानक ही भेट होणार नाही असं भारतीय परराष्ट्र खात्यातर्फे जाहीर करण्यात आलं. सीमा सुरक्षा दलाचा जवान नागेंद्र सिंग याचा गळा कापलेला देह आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने मारलेला दहशतवादी बु-हाण वाणी याच्या स्मरणार्थ पाकिस्तान सरकारने छापलेली टपाल तिकिटे या पार्श्वभूमीवर, ‘पाकिस्तान सुधारण्याची काही चिन्हं दिसत नाहीत. इम्रान खान यांनी काही महिन्यांतच आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्ही उभय परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द करत आहोत’ असं भारतातर्फे जाहीर केलं गेलं.
वरवर पाहता हे कारण कुणालाही पटेल इतकं ते योग्य आहे. पण यातील गडबड लक्षात घ्या.
● बेपत्ता झालेल्या नागेंद्र सिंग याचा देह सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी रेंजर्स यांनी एकत्र तपास करून शोधून काढला होता.

● इम्रानचं पत्रं येण्याच्या काही दिवस आगोदर त्याच्या मृत्यूचा अहवाल भारत सरकारला सादर झाला होता.
● त्याच्या मृत्युला पाकिस्तान जबाबदार होतं असं जर अहवालात म्हटलं असेल तर मुळात मोदी यांनी इम्रानचा प्रस्ताव स्वीकारलाच कसा?
● बु-हाण वाणीची टपाल तिकिटं, इम्रान पंतप्रधान होण्याच्या आधी कित्येक दिवसांपूर्वी, निवडणुकीच्या काळात काळजीवाहू सरकार असताना छापली गेली होती. त्याच्या बातम्या सुद्धा छापून आल्या होत्या. इम्रानचा प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी भारत सरकारला याची कल्पना नव्हती?
● पाकच्या पंतप्रधानांनी ‘काही महिन्यांतच’ आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे, असं म्हणणा-या भारत सरकारला कळायला हवं होतं की इम्रान पंतप्रधान झाल्याला केवळ एक महिना झाला आहे.

आता भारत-पाकिस्तान संवाद येते सहा महिने तरी शक्य नाही. मोदी यांना तेच हवं होतं. उलट आमसभेत कुरेशी आणि स्वराज यांच्यात चकमकी झडतील. २०१९ पर्यंत उभय देशात वातावरण तापत ठेवणं ही त्यांची राजकीय गरज आहे. त्यामुळे स्वराज-कुरेशी चर्चेची संधी काहीतरी निमित्त शोधून त्यांनी सोडून दिली. त्यांची राजकीय गरज देशाच्या हितापेक्षा मोठी आहे.
पाकिस्तानात भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केलेले शरद सभरवाल म्हणतात, भेट रद्द करताना भारताने वापरलेली भाषा उन्मत्तपणाची आहे. लहान मुलांच्या काॅमिक पुस्तकातला हिरो अशी भाषा वापरतो. ती शिष्टाचारांना धरून नाही. अन्य देशाच्या पंतप्रधानाचा कधीच वैयक्तिक उल्लेख केला जात नाही. भारताने ७० वर्ष कटाक्षाने पाळलेला हा संकेत प्रथमच मोडला गेला.
या दादागिरीमुळे नेपाळ आज पूर्णतः चीनकडे झुकलाय आणि श्रीलंका भारताला फार भाव देत नाही. गेल्या चार वर्षांत तिथे चीनचं बंदर तयार झालं. एकूणच शेजा-यांशी आपले संबंध पार बिघडलेत. इम्रानमुळे पाकिस्तानशी ते चुटकी सरशी सुधारतील अशा भ्रमात राहू नये. पण क्रिकेटमुळे इम्रानचं भारताशी असलेलं नातं लक्षात घेता, मी आशावादी आहे. पण राजकीय स्वार्थासाठी मोदी यांनी अचानक घुमजाव केल्यानंतर तो सुद्धा संतापलाय. ‘ज्यांना भविष्याचा वेध घेण्याचा विशाल दृष्टिकोन नाही अशी कोत्या मनाची माणसं, मोठ्या पदांवर बसली की हे असं होतं’, अशी जळजळीत प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.

डाॅलरच्या तुलनेत रुपया इतका घसरला आहे की अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत, मुंबईत पेट्रोलने नव्वदी ओलांडली, राफेलच्या भडिमारातून पळताना मोदी सरकारच्या नाकी नऊ आले आहेत. ते दाखवतात तसे स्वच्छ नाहीत हे सिद्ध झालं आहे. अशावेळी जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवायला भारत-पाकिस्तान दुष्मनी हा संवेदनशील विषय त्यांनी कावेबाजपणे निर्माण केला. आता पुन्हा जो तणाव वाढेल, मोदी भक्त तो वाढवतील, आणि त्याचा पुरेपूर फायदा मोदी निवडणुकीत घेतील. त्यांच्याकरता सत्ता महत्त्वाची आहे, देशाचं भलं नाही.
डाॅ. जितेंद्र आव्हाड

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार