fbpx

एका महिन्याच्या आत जितेंद्र आव्हाड दुसऱ्यांदा उद्धव ठाकरेंच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. ‘उग्रलेख’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आव्हाड हे मातोश्रीवर गेले होते.आव्हाड हे सुमारे एक तास मातोश्रीवर होते.

आव्हाड यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या ब्लॉगचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. अक्षर प्रकाशन हे या पुस्तकाचे प्रकाशक आहे. या पुस्तकाची प्रत देण्यासाठी व १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आव्हाड हे रविवारी ‘मातोश्री’वर गेले होते.