…तरी काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत; विरोधकांच्या टीकेला आव्हाडांचं उत्तर

avhad

मुंबई : महाराष्ट्रातही मुंबईत करोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरलं आहे. पहिल्या लॉकडाउनपासून धोरणात्मक निर्णय घेण्यात या सरकारने चुका केल्या असंही फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं होतं. तसंच काही दिवसांपूर्वी विरोधकांनी राज्यभर सरकारविरोधात आंदोलनही केलं होतं.

याच पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांनी केलेल्या प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला.

ट्विट करत आव्हाड म्हणतात, ‘मुंबईचे मॉडेल देशभर राबवा. हे देशासमोरील सर्वोत्तम उदाहरण आहे, असं नीति आयोगानं आणि आयसीएमआरनं म्हटलं आहे. तर दुसरीकडे गुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही बिकट आहे, असं गुजरात न्यायालयानं म्हटलं आहे. तरी काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत’.

दरम्यान, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून हे सरकार निष्क्रिय आहे, असा आरोप भाजप वारंवार करत आहे. मात्र भाजपच्या या आरोपाचा कोणताच परिणाम आम्हाला होत नसल्याचं सत्ताधारी दाखवत आहेत. उलट भाजप या संकटात सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.

मुख्यमंत्री दिसण्यापेक्षा काम दिसणे महत्त्वाचे; विरोधकांना CM ठाकरेंनी दिले रोखठोक प्रत्युत्तर

‘…त्यामुळे लोकांनी सरकारवर अवलंबून न राहता आपल्या आयुष्याची सुरवात केली पाहिजे’

#coronvirus : राज्यात २,५९८ नवे कोरोनाबाधित; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर