जीपने धडक दिल्याने काका ठार तर पुतण्या जखमी

टीम महाराष्ट्र देशा – काका -पुतण्याच्या दुचाकिला भरधाव वेगात येणा-या जिपने धड़क दिल्याने झालेल्या एकाचा मृत्यू झाला तर एक जन जखमी झाला आहे अपघाता नंतर जीप चालक जीपसह घटनास्थळावरून फरार झाला आहे या प्रकरणी दिंद्रूड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे तेलगाव येथील अर्जुन आत्माराम धुमाळ हे आपला पुतण्या संतोष धुमाळ याच्यासह दुचाकीवरुन तेलगाव कारखान्यासमोरुन गावात येत होते. त्या वेळी पाठीमागून आलेल्या मालवाहू जीप (क्र. एमएच 25 पी- 5344) ने त्यांना जोराची धडक दिली. दोघेही रस्त्यालगत पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होऊन अर्जुन धुमाळचा मृत्यू झाला. संतोष धुमाळवर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर चालक जीपसह पसार झाला. हिंदुस्थान समाचार