जीओ लवकरच आणणार 5G नेटवर्क, गुगलसोबत मिळून स्मार्टफोनही बनवणार

mukesh aambani

मुंबई- संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेलं 5G नेटवर्क पुढील वर्षात भारतात लाँच करणार असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिली. वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अंबानी यांनी याबाबत माहिती दिली. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावेळी रिलायन्सनं जिओ मीट द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं होतं.

रिलायन्स इंडस्ट्रीची 43व्या एजीएम (आरआयएल 43 वा एजीएम 2020) सुरू झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी AGMमध्ये गुंतवणूकदारांचे स्वागत केले. विशेष म्हणजे गुगलबरोबर मिळून 4जी- 5जी स्मार्टफोन बनवणार असल्याचंही रिलायन्सनं जाहीर केलं आहे.

अंबानी म्हणाले, हे स्मार्टफोन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असतील. मुकेश अंबानी म्हणाले की, आतापर्यंत 10 कोटींहून अधिक लाइव्ह फोनची विक्री झाली आहे. परंतु तरीही फीचर फोन युजर्स स्मार्टफोन येण्याची वाट पाहत आहेत. आमचा विश्वास आहे की आम्ही एन्ट्री लेव्हलला 4जी आणि 5जी स्मार्टफोन बनवू शकतो.

आम्ही असा फोन डिझाइन करू शकतो, ज्याची किंमत सामान्य स्मार्टफोनपेक्षा कमी असेल. तसेच गुगल आणि जिओ मिळून एक व्हॅल्यू इंजिनियर्ड अँड्रॉइड बेस्ड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम तयार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

रिलायन्स जीओसोबत केलेल्या भागीदारीबाबत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी माहिती देताना, ‘प्रत्येकाला इंटरनेटचा ऍक्सेस असणे आवश्यक आहे. गुगल फॉर इंडिया डिजिटायझेशन या फंडातून आम्ही रिलायन्स जिओ सोबत ४.५ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करीत आहोत. याद्वारे भारतातील स्मार्टफोन नसलेल्या कोट्यवधी लोकांना इंटरनेट ऍक्सेस देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.’ असं स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ राज्यातील सरकारने 31 जुलैपर्यंत वाढवला ‘लॉकडाउन’

पुण्यात आता ‘कोरोना किलर’ उपकरण, इंडोटेक कंपनीने केला विषाणूंपासून बचावाचा दावा

‘मी अद्यापही काँग्रेसमध्येच आहे,पुढे काय करायचं याचा निर्णय समर्थकांशी चर्चा करुनच घेऊ’

‘या’ काँग्रेस नेत्याची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज