जिओ इंटरनेटचा स्पीड कमी झालाय का ? तर ही आहेत कारणे

jio sim

टीम महाराष्ट्र देशा – 

Loading...

तुमच्याकडे रिलायन्स जिओचं कार्ड आहे तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

युजर्सच्या तक्रारी
जिओचा स्वस्त ४जी स्मार्टफोन लवकरच बाजारात पहायला मिळणार आहे. कंपनीने यासाठी काम सुरु केलं आहे. स्मार्टफोनसोबतच जिओ आपल्या ग्राहकांसाठी अधिक इंटरनेट डेटा असलेला प्लान देत आहे. हायस्पीड इंटरनेटचा दावा करणाऱ्या जिओच्या इंटरनेट स्पीडसंदर्भात युजर्सच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.

इंटरनेटचा स्पीड कमी
युजर्सच्या मते, जिओचा इंटरनेट स्पीड जितका असल्याचा दावा कंपनीने केला होता तितका स्पीड सध्या मिळत नाहीये. युजर्सच्या मते, पूर्वी ४जी स्पीड २० ते २५ mbps मिळत होता मात्र आता केवळ ३.५ mbps स्पीड मिळत आहे.

सेटिंगमध्ये बदल
मात्र, असं असलं तरी स्पीड जिओकडून कमी आहे असं नाहीये. कारण, युजर्सने आपल्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये केलेल्या बदलांमुळेही स्पीड कमी होऊ शकतो. त्यामुळे युजर्सने आपल्या फोनमधील सेटिंग बदलण्याची गरज आहे त्यानंतर त्यांना फास्ट स्पीड मिळण्यास सुरुवात होईल. ही सेटिंग खूपच सोपी आहे आणि कुणीही अगदी सहजपणे करु शकतं.

पाहूयात काय आहे ही सेटिंग
१) APN सेटिंग बदला
APN सेटींग बदलुन तुम्ही जिओचा ४जी स्पीड वाढवू शकता. त्यासाठी तुम्हाला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क्सचा पर्याय असेल. त्याच्यात प्रिफर्ड नेटवर्क टाइपला LTE मध्ये सेट करा.

२) APN प्रोटोकॉल पर्याय निवडा
मोबाईल सेटिंगमध्ये गेल्यावर Access point names सिलेक्ट करा. यावर क्लिक केल्यास तुम्हाला अनेक ऑप्शन्स दिसतील. त्यापैकी APN प्रोटोकॉल असलेलं ऑप्शन निवडा. त्याला Ipv4/Ipv6 वर ठेवा.

३) Bearer ऑप्शन बदला
सेटिंग्जमध्येच Bearer चं ऑप्शन असेल त्या ठिकाणीही LTE सिलेक्ट करा.

४) कॅशे फाईल्स डिलीट करा
अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये रँडमली अनेक फाईल्सचा वापर होतो आणि त्या सेव्ह होतात. या फाईल्सला कॅशे फाईल्स असं म्हणतात. या फाईल्स डिलीट केल्यास तुमच्या फोनचा स्पीड वाढू शकतो.Loading…


Loading…

Loading...