Relince Jio- स्मार्टफोनसोबत मिळणार 448 जीबी डेटा

jio sim

Relince Jio offer – गॅलक्सी S8 आणि S8+ हे दोन स्मार्टफोन सॅमसंगने लॉन्च केले होते. हे स्मार्टफोन खरेदी करणा-यांना जिओकडून तब्बल २२४ जीबी अतिरीक्त डेटा दिला जाणार आहे. हा डेटा ग्राहकांना आठ महिन्यांसाठी दिला जाणार आहे. ऑफरचा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांना जिओची प्राईम मेंबरशिप घ्यावी लागेल अशी ऑफर जिओने दिली आहे.

जिओ धन धना धन ऑफर अंतर्गत 309 रुपयांमध्ये मिळणाऱ्या 28 जीबी डेटासह जास्तीचा 28 जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच महिन्याला 56 जीबीचा मोफत डेटा ग्राहकांना मिळणार आहे. ग्राहकांसाठी पुढील 8 महिने ही ऑफर देण्यात येणार आहे. त्यामुळे 8 महिने 224 जीबी अतिरिक्त डेटा म्हणजेच एकूण 448चा डेटा मिळणार आहे.