जिओचा ‘हा’ प्लॅन झाला महाग, आता मोजावे लागणार अजून जास्त पैसे

टीम महाराष्ट्र देशा :जिओ फोनच्या ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे. कारण सर्वात स्वस्त ४९ रुपयांचा प्लान आता मिळणार नाही. काही दिवसांपूर्वीच टेरिफ प्लान मध्ये बदल करण्यात आले आहे. त्यामुळे रिलायंस जीओने ‘जिओ फोन मध्येहि बदल केले. ४९ ऐवजी ७५ रुपयांचा प्लान हा सर्वात कमी किमतीचा असेल.

75 रुपयांचा हा प्लॅन काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आलेला. हा ‘ऑल-इन-वन प्लॅन’चाच एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे. 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची मोफत सुविधा अमर्यादित कॉलिंग अशी होती. तर आता 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित जिओ-टू-जिओ कॉलिंग, इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 500 मिनिटं, दररोज 100 mb इंटरनेट डेटा आणि 50 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे.

Loading...

जिओने सुरु केलेल्या मोफत आउटगोइंग सुविधा आता बंद करण्याचा निर्णय जिओ कंपनीने घेतला आहे. आता कॉल साठी पैसे आकारले जाणार आहे. अलीकडेच जिओ नंतर ऐर्टेल ने आउटगोइंग कॉंल ची वेळ कमी केली आहे. आधी हा कालावधी ४० सेकंदाचा होता तर आता हा कालावधी २० सेकंदाचा करण्यात आला आहे.

टेलिकॉमटॉक’च्या रिपोर्टनुसार, 75 रुपयांच्या प्लॅनसह 99 रुपये, 153 , 297 आणि 594 रुपयांचेही प्लॅन्स देखील रिचार्जसाठी उपलब्ध आहेत. परंतू युजर्सला नॉन-जिओ कॉलिंगसाठी अतिरिक्त IUC टॉप-अप रिचार्जसाठी पैसे खर्च करावे लागणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार