जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅपला ‘नो एन्ट्री’

jio-phone-has-no-whatsapp-support

वेबटीम : रिलायन्स जिओच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओच्या फोनची घोषणा केल्यानंतर आता सर्वाना उत्सुकता लागली आहे ती हा फोन कसा असणार याची.

रिलायन्स जिओचा व्हॉईस कमांडिंग 4G फीचर फोनची 24 ऑगस्टपासून प्री बुकिंग करता येणार आहे. केवळ 153 रुपयांमध्ये ग्राहकांना महिन्याला अनलिमिटेड डेटा आणि व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. मात्र केवळ 500 एमबीपर्यंतच हायस्पीड डेटा मिळले, त्यानंतर स्पीड कमी होईल, अशी माहिती समोर आली आहे.

1500 रुपये अनामत रक्कम ठेवून हा फोन मोफत दिला जाणार आहे. मात्र असं असलं तरी या फोनमध्ये व्हॉट्सअप चालणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअप यूझर्स आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांना हा फोन निराश करु शकतो. मात्र या फोनमध्ये कंपनीचं जिओ चॅट हे अॅप येणार आहे.