fbpx

रिलायन्सच्या गिगा फायबरची माहिती लिक

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय बाजारपेठेत जिओने टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर धुमाकूळ घातला होता. आता जिओ आपल्या ग्राहकांसाठी गिगा फायबर केबल द्वारे इंटरनेट सुविधा घेऊन येत आहे. याचं जिओ गिगा फायबरची माहिती लिक झाली आहे तर ती सोशल मिडीयावर व्हायरल देखील होत आहे,

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओ गिगाफायबरबाबत अनेक बाबी आतापर्यंत लिक झाल्याचे समोर आले होते. यामध्ये फायबर ऑप्टीकचा वापर करण्यात आल्याने याद्वारे उत्तम इंटरनेट स्पीडही मिळणार आहे आता आणखी एक माहिती जिओच्या गिगा फायबर प्लॅनबाबत समोर आली आहे. यानुसार ६०० रूपये प्रति महिना गिगाफायबरचा सुरूवातीचा प्लॅन असणार आहे. युझरला यामध्ये ५०Mbps चा स्पीड मिळणार आहे. तर १००Mbps स्पीडच्या प्लॅनसाठी प्रीव्ह्यू सब्सक्रायबर्सना महिन्याला १ हजार रूपये मोजावे लागणार आहेत. परंतु जिओकडून याबात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

रिलायन्स जिओची भारतात खूप मोठी बाजारपेठ व्यापली आहे. यातच जिओ गिगा फायबरची चर्चा सर्वत्र पसरली आहे. तर ते लाँच कधी होणार आणि काय प्लॅन असतील याबाबत ग्राहकांमध्ये खूप मोठी उत्सुकता पाहायला मिळते आहे.