fbpx

मातृतिर्थावर जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणार तीन छत्रपती

जिजाऊ

टीम महाराष्ट्र देशा- साताऱ्याचे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, तंजावरचे छत्रपती बाबाजी राजे भोसले, कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजी राजे भोसले हे तीनही छत्रपती सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) येथील मातृतिर्थावर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी 12 जानेवारीला उपस्थित राहणार आहेत.

मराठा सेवा संघाच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते . मातृतिर्थावर जिजाऊ जन्मोत्सवाचा निमित्ताने अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय दर वर्षी जमा होत असतो .यंदा तीनही छत्रपती या ठिकाणी येणार असल्याने मोठा उत्साह पहायला मिळत आहे.या शिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील या ठिकाणी भेट देणार असल्याची चर्चा आहे.