जिग्नेश मेवाणी, उमर खलीद ३१ डिसेंबर रोजी शनिवार वाड्याला भेट देणार

पुणे : गुजरात निवडणुकीमध्ये भाजपला चांगली लढत देऊन आमदारकी मिळवणारा जिग्नेश मेवाणी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू, नवी दिल्ली) विद्यार्थी नेता उमर खालिद या दोघांच्या भाषणाचे आयोजन करण्यात आले आहे.

३१ शनिवार वाड्यावर डिसेंबर रोजी रात्री ही 1 जानेवारीला भीमा-कोरेगाव लढ्याला 200 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून भीमा-कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान राबविण्यात येत आहे. त्यात 16 जिल्ह्यातील 250 संघटना एकत्रित येत असून त्यानिमित्त 31 डिसेंबर रोजी शनिवारवाड्यावर ‘एल्गार परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेला जिग्नेश मेवाणी, उमर खालिद, तसेच रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला या सहभागी होणार आहेत. प्रकाश आंबेडकर, निवृत्त न्या. पी. बी. सावंत, बी. जी. कोळसे पाटील, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना अजहरी, विनय रतन सिंग, प्रशांत दोंथा यांचीही भाषणे होणार आहेत.

You might also like
Comments
Loading...