मोदी आता म्हातारे झालेत त्यांनी सन्यास घेवून हिमालयात जाव – जिग्नेश मेवाणी

Jignesh_Mevani

टीम महाराष्ट्र देशा: मोदी आता म्हातारे झाले असून त्यांची भाषणे देशातील नागरिकांना पकवतात, त्यामुळे त्यांनी सन्यास घेवून हिमालयात जाव अस वादग्रस्त वक्तव्य गुजरातचे आमदार आणि दलित युवा नेता जिग्नेश मेवाणी यांनी केल आहे. गुजरातमध्ये १५० जागा मिळवण्याचा दावा मोदी आणि शहा करत होते, मात्र आता त्यांचा अहंकार मोडून निघाला असून मोदींनी आता राजकारणातून सन्यास घ्यावा असा घणाघातही मेवानी यांनी केला. एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

२०१९ साठी आम्ही पूर्णपणे सज्ज असून पंतप्रधानांच्या खोट्या आश्वासनांना युवक आता कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांनी जुमलेबाजी करावी आणि राजकारणातून निवृत्ती घेवून हिमालयात जाऊन यापुढचं जीवन तेथेच जगावं असही मेवणी म्हणाले. दरम्यान आपल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी जरी माफी मागायला लावली तरी आपण मागणार नसल्याच उत्तर त्यांनी दिल आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून १५० जागा मिळवणार असल्याचा दावा केला जात होता. मात्र निकालांमध्ये हा दावा फोल ठरला असून केवळ ९९ जागा मिळवण्यात भाजपला यश मिळाले आहे. दरम्यान निवडणुकी प्रचारात देखील दोन्ही बाजूकडून मोठी चिखलफेक करण्यात आली होती. तेच चित्र सध्याही पहायला मिळत आहे.