स्वातंत्र्य संग्रामात संघाच्या कार्यकर्त्याचा रक्ताचा थेंबही सांडला नाही – जिग्नेश मेवाणी

टीम महाराष्ट्र देशा : देशातले समाजवादी नेते जेव्हा जातपात विसरले होते. जेव्हा बाकी सगळे नेते स्वातंत्र्यासाठी जंगजंग पछाडत होते तेव्हा चड्डीवाले संघाचे नेत हिंदु मुसलमानंमध्ये भांडण लावण्याची तयारी करत होते. संघाच्या स्वयंसेवकांचा रक्ताचा थेंबही स्वातंत्र्य संग्रामात सांडला नाही असा घणाघात गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केला आहे.

कर्नाटक निवडणुकीच्या निमित्तानं बंगळुरूमध्ये होते. अभिनेते प्रकाश राजही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. गुजरात निवडणुकीमध्ये जिग्नेश मेवणी यांनी भाजपला चांगलच कोंडीत पकडल होत. आता कर्नाटक निवडणुकीत जिग्नेश मेवणी भाजपला किती अडचणीत आणू शकतात हे पाहण्यासारख आहे.