गुजरात : जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) यांना महेसाणा कोर्टातून मोठा झटका बसला असून मेवाणी यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. जिग्नेश मेवाणी यांच्यासह राष्ट्रवादीच्या रेश्मा पटेल आणि सुबोध परमार यांनाही तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण विनापरवानगी रॅली काढण्याचे असून यामध्ये एकूण १२ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे.
जिग्नेश मेवाणी, रेश्मा पटेल आणि सुबोध परमार यांना ज्या खटल्यात शिक्षा झाली आहे तो खटला जवळपास पाच वर्षे जुना आहे. २०१७ मध्ये त्यांनी स्वातंत्र्य पदयात्रा काढली. ही रॅली विनापरवाना केल्याचा आरोप करण्यात आला. आता महेसाणा न्यायालयाने त्यांना याच प्रकरणात दोषी ठरवले आहे.
आमदार जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादीच्या नेत्या रेश्मा पटेल, सुबोध परमार यांच्यावर मोर्चा काढून सरकारी अधिसूचनेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. रेश्मा पटेल या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. उना येथील दलितांना मारहाणीचे प्रकरण समोर आल्यानंतर १२ जुलै २०१७ रोजी मेहसाणाजवळील बनासकांठा येथे ‘आझाडू कूच’ या नावाने आंदोलन करण्यात आले. .
जिग्नेश मेवाणी जामिनावर बाहेर
सध्या जिग्नेश मेवाणी जामिनावर बाहेर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी मेवाणी यांना आसाम पोलिसांनी गुजरातमधून अटक केली होती. त्यानंतर जिग्नेश मेवाणीला कोक्राझार कोर्टातून जामीन मिळाला. मात्र, त्यानंतर लगेचच जिग्नेशला एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी दुसऱ्या पोलीस ठाण्यात अटक केली होती.त्यानंतर या प्रकरणातही मेवाणीला जामीन मिळाला होता. सध्या आसाम सरकारने या जामीनाविरोधात गुवाहाटी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “आगामी निवडणूक मी भोंग्याशिवाय लढणार”, बच्चू कडू यांची घोषणा
- IPL 2022 CSK vs RCB : “मी आता तुझ्यासोबत बॅटिंग करू शकत नाही…”, सर्वांसमोर मॅक्सवेलनं विराटला सुनावलं; पाहा VIDEO!
- ‘मर्सिडीज बेबी’ म्हणून डिवचणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- मोठी बातमी : नवनीत राणांची भायखळा कारागृहातून सुटका; हनुमान चालीसा प्रकरणी झाली होती अटक
- IPL 2022 CSK vs RCB : मुकेश चौधरीनं विराटला फेकून मारला बॉल..! पण नक्की झालं काय? पाहा VIDEO!